सैनिकी सेवापूर्व प्रशिक्षण संस्था (SPI) विषयी माहिती
सन 1954 मध्ये महाराष्ट्रातील पुणे शहरात नॅशनल डिफेन्स अकॅडमी (NDA) ची स्थापना झाली. सुरवातीला महाराष्ट्रातील मोजकेच विद्यार्थी आपल्या देशातील या सर्वोच्च संरक्षण शिक्षण संस्थेमध्ये असायचे, त्यामुळे नॅशनल डिफेन्स अकॅडमी महाराष्ट्रात होती पण महाराष्ट्र त्यात नव्हता अशी परिस्थिती होती.महाराष्ट्रातील अधिकाधिक विद्यार्थी या संस्थेमध्ये यावे आणि संरक्षण सेवेत येऊन अधिकारी व्हावेत यासाठीच महाराष्ट्र सरकारने सैनिकी सेवापूर्व संस्था, औरंगाबाद ची स्थापना केली. गेली पन्नास वर्ष ही संस्था महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना NDA मध्ये प्रवेश मिळण्यासाठी प्रशिक्षण तथा मार्गदर्शन करत आहे. आज रोजी पाचशेहून अधिक विद्यार्थी या संस्थेच्या माध्यमातून नॅशनल डिफेन्स अकॅडमी मध्ये प्रवेश मिळवून संरक्षण क्षेत्रात अधिकारी होण्यात यशस्वी झालेत.त्यामुळेच महाराष्ट्रातील संरक्षण क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या विदयार्थ्यांसाठी SPI AURANGABAD हा सर्वोत्तम पर्याय आहे.
दरवर्षी महाराष्ट्रातील हजारो विद्यार्थी ही SPI AURANGABAD प्रवेश परीक्षा देतात. त्यातून फक्त 300 विद्यार्थ्यांना मुलाखतीसाठी बोलावले जाते आणि अंतिमतः 60 विद्यार्थी या संस्थेत प्रशिक्षणासाठी निवडले जातात.दोन वर्षांच्या खडतर परिश्रम आणि प्रशिक्षणानंतर विद्यार्थी NDA प्रवेश परीक्षेसाठी पात्र होतात आणि त्यांची NDA परीक्षा पास होण्याची शक्यता आणखी वाढते.
SPI प्रवेश परीक्षा ही महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना NDA मध्ये प्रवेश मिळविण्यासाठी एक महत्वाची परीक्षा आहे. या परीक्षेची तयारी बरेच विद्यार्थी 8 वी किंवा 9 वीच्या वर्गात असतानाच सुरू करतात तर काही विद्यार्थी 10 वीत असताना वर्षभराच्या मेहनतीवर सुद्धा या परीक्षेत यश मिळवितात.
SPI संस्थेत प्रवेश मिळाल्यानंतर विद्यार्थ्यांच्या आयुष्याला एक नवी दिशा मिळते. फक्त NDA च नाही तर येथील विद्यार्थी UPSC, MPSC मार्फत घेण्यात येणाऱ्या नागरी सेवेत आयएएस, आयपीएस यांसारख्या परीक्षेत किंबहुना राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील उच्च अशा करिअरसाठी येथील विद्यार्थी पात्र ठरतात.
गेल्या काही वर्षांपासून महाराष्ट्रातील विद्यार्थी आणि पालकांमध्ये SPI प्रवेश परीक्षेबाबत रुची वाढत आहे.त्यामुळेच दरवर्षी या परीक्षेस बसणाऱ्या विद्यारथ्यांची संख्या आपल्याला वाढताना दिसते. या शैक्षणिक वर्षापासून मुलींनाही प्रवेश देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.आणि मुलींसाठी SPI नाशिक सुरू करण्यात आले आहे.
महाराष्ट्रातील विद्यार्थी जे संरक्षण क्षेत्रात करिअर करू इच्छितात अशा विदर्थ्यांसाठी सैनिक सेवापूर्व संस्था SPI ही एक उत्तम संस्था आहे आणि या संस्थेत प्रवेश परीक्षा मध्ये विद्यार्थ्यांना यश मिळविण्यासाठी आम्ही गेल्या दोन वर्षांपासून मार्गदर्शन तसेच तयारी करून घेत आहोत.
आम्ही विद्यार्थ्यांना लेखी प्रवेश परीक्षा संपूर्ण सिलॅबस, टेस्ट सिरीज, उत्तम स्टडी मटेरियल तसेच इंटरवह्यू ची तयारी असे अनेक उपक्रमांतून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत असतो.
मागील वर्षी आमच्या मार्गदर्शनाखाली SPI प्रवेश परीक्षेत यश मिळवून इंटरवह्यू साठी बोलवण्यात आलेल्या 300 विद्यार्थ्यांमध्ये आमचे 29 विद्यार्थ्यांनी स्थान मिळविले होते.
यावर्षी आम्ही 100 हून अधिक विद्यार्थी SPI प्रवेश लेखी परीक्षेत आणि इंटरिव्ह्यू मध्ये यशस्वी करण्यासाठी प्रयत्न करत आहोत. आमचे विषयतज्ञ अनुभवी प्राध्यापक, तज्ञ मार्गदर्शक, परीक्षा तज्ञ , इंटरव्ह्यू तज्ञ आणि इतर अनेक जणविद्यार्थ्यांना यशस्वी करण्यासाठी प्रयत्न करत आहोत.
सैनिक सेवापूर्व संस्थेत प्रवेश मिळविण्याच्या तुमच्या ध्येयाला साध्य करण्यासाठी आम्ही सज्ज आणि सक्षम आहोत.
जय हिंद! जय महाराष्ट्र !संचालक, आस्था सैनिकी गुरुकुल फाऊंडेशन औरंगाबाद, महाराष्ट्र.SPIcoachingclasses.com