SPI प्रवेश परीक्षाविषयी सविस्तर माहिती
1: SPI प्रवेश परीक्षा अभ्यासक्रम (सिलॅबस)SPI संस्थेने प्रवेश परीक्षेचा विशेष असा सिलॅबस दिलेला नाही. सामान्यतः प्रवेश परीक्षा ही इयत्ता 8 ,9 आणि 10 वीचा स्टेट बोर्ड आणि सीबीएसई बोर्डाच्या अभ्यासक्रम यावर आधारित असते. यामध्ये प्रामुख्याने गणितं , बुद्धिमत्ता, विज्ञान, इंग्रजी, सामाजिक शास्त्र, चालू घडामोडी आणि सामान्य ज्ञान या विषयांचा समावेश होतो. 2: SPI प्रवेश परीक्षा कधी, कोठे आणि कोणते विद्यार्थी देऊ शकतात प्रवेश परीक्षा ही एकाच दिवशी महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील प्रामुख्याने औरंगाबाद , मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर, कोल्हापूर, अमरावती, लातूर येथील परीक्षा केंद्रावर घेण्यात येते. या प्रवेश परीक्षेसाठी महाराष्ट्र राज्याचे अधिवास (DONICILE ) असलेले इयत्ता 10 वीत शिकणारे स्टेट बोर्ड, सीबीएसई बोर्ड तसेच आयसीएसई बोर्डाचे विद्यार्थी पात्र असतात. ही परीक्षा विद्यार्थ्यांना फक्त एकदाच देता येते.
3: प्रवेश परीक्षेचे स्वरूपSPI प्रवेश परीक्षेमध्ये एकूण 150 प्रश्न असतात पैकी 75 प्रश्न गणितं विषयाचे आणि 75 प्रश्न इतर इंग्रजी, विज्ञान, समाजशास्त्र, चालू घडामोडी आणि बुद्धिमत्ता या विषयांवर असतात. ही परीक्षा बहुपर्यायी प्रश्न स्वरूपाची म्हणजेच ऑब्जेक्टीव प्रकारची असते. ही परीक्षा निगेटिव्ह मार्किंग स्वरूपाची असून प्रत्येक बरोबर उत्तराला एक मार्क असतो आणि प्रत्येक 2 चुकीच्या उत्तरांसाठी 1 मार्क वजा होतो.निगेटिव्ह मार्किंग ही या परीक्षेला कठीण बनवते.(गेल्यावर्षी निगेटिव्ह मार्किंग नव्हती, आम्ही तुम्हाला याविषयी परिक्षेआधी सविस्तर माहिती देऊ )
SPI परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर होणाऱ्या मुलाखतीचे स्वरूप कसे असतेSPI संस्थेच्या मुलाखती मध्ये विद्यार्थ्यांच्या शालेय अभ्यासक्रम व्यतिरिक्त त्यांचे व्यक्तिमत्त्व, आत्मविश्वास, इंग्रजी भाषेवरील प्रभुत्व बघितले जाते तसेच त्यांच्या आवडीनिवडी, छंद, सामान्य ज्ञान, नजीकच्या चालू घडामोडी तसेच त्यांनी आजवर मिळवलेल्या विविध प्रावीण्य यांवर प्रश्न विचारले जातात. ही मुलाखत निवृत्त लष्करी अधिकारी तसेच संस्थेचे संचालक मंडळ यांच्यामार्फत घेतली जाते. प्रामुख्याने मुलाखत ही इंग्रजी भाषेतून असते पण गरज पडल्यास विद्यार्थी हिंदी किंवा मराठी भाषेतून उत्तर देऊ शकतात.
जय हिंद! जय महाराष्ट्र !आस्था सैनिकी गुरुकुल फाऊंडेशन
औरंगाबाद, महाराष्ट्र. SPIcoachingclasses.com